ग्रा. पं. शिरगांव अंतर्गत घेण्यात आलेले आरोग्य शिबिर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गुप ग्रामपंचायत शिरगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या आरोग्य सुविधेसाठी ‘भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील सर्व वर्गातील ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:

  • तपासणी: तज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar), आणि डोळ्यांची मोफत तपासणी.

  • औषधोपचार: गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप.

  • मार्गदर्शन: पावसाळी आजार (डेंग्यू, मलेरिया) आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन.

  • सहभाग: गावातील सुमारे २०० पेक्षा जास्त नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.